चेन्नईत 12 कर्मचाऱ्यांना गिफ्टमध्ये मिळाली ऑडी कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षभर मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱया एकूण 12 कर्मचाऱ्यांवर कंपनीने मेहरबानी दाखवली असून बक्षीस म्हणून या कर्मचाऱ्यांना महागडी ऑडी कार गिफ्ट केली आहे. रेफेक्स ग्रुप कंपनीने या कर्मचाऱ्यांवर कौतुकाची थाप म्हणून ही महागडी कार भेट म्हणून दिली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी ऑडी ए4 सेडान कार दिली आहे. या कारची किंमत 47 लाखांपासून सुरू होऊन 56 लाखांपर्यंत आहे. वर्षभर मेहनत करणाऱ्या कर्मचाऱयांना व्हील ऑफ अचिव्हमेंट अंतर्गत हे गिफ्ट देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.