
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुयान सरमा यांच्यावर केलेल्या आरोपांच्या संदर्भात खेरा यांच्यावर आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती के. सुजाना यांच्या खंडपीठाने खेरा यांना संबंधित न्यायालयात दाद मागण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देत, सात दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने आदेश देताना म्हटले की, पवन खेरा हे सामान्य व्यक्ती नसून त्यांनी यापूर्वीच कायदेशीर प्रक्रियेसाठी वेगाने पावले उचलली आहेत. खेरा यांच्या वकिलांनी अधिक वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत एक आठवड्याच्या आत योग्य कायदेशीर व्यासपीठावर अर्ज करण्याचे निर्देश दिले. या एका आठवड्याच्या सवलतीमुळे पवन खेरा यांना आता आसाममधील संबंधित न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे शक्य होणार आहे.
पवन खेरा यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी तहकूब, आज निर्णय होण्याची शक्यता



























































