
देशात दलितांवर अत्याचार होत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी डोळे बंद करून बसले आहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. तसेच या घटना म्हणजे संघ-भाजपच्या सामंतवादी विचारसरणीचे परिणाम आहेत असेही खरगे म्हणाले.
खरगे यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटले आहे की, नरेंद्र मोदीजी, एनसीआरबीच्या अहवालानुसार 2013 ते 2023 दरम्यान दलितांवर होणाऱ्या गुन्ह्यांत 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर आदिवासींविरुद्धच्या गुन्ह्यांत 91 टक्क्यांची वाढ झाली आहे.
तसेच हरियाणामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्यावर जातीय भेदभाव, हरिओम वाल्मीकि यांची छळवणूक, भारताच्या मुख्य न्यायाधीशांचा अपमान आणि त्या वर्तनाला योग्य ठरवण्याची प्रवृत्ती, तसेच भाजपशासित राजस्थानातील सवाई माधोपुर जिल्ह्यातील दलित वृद्ध महिला कमला देवी रैगर यांच्यावरचा अत्याचार. या सर्व घटना केवळ स्वतंत्र घटना नाहीत, तर आरएसएस–भाजपच्या सामंतवादी विचारसरणीचे परिणाम आहेत.
तसेच या घटनांची मालिका भारताच्या संविधानावर, सामाजिक न्याय आणि समानतेच्या मूलभूत तत्वांवर थेट हल्ला आहे. दलित, मागासवर्ग, आदिवासी आणि वंचित समाजाला भयभीत करून दडपण्याची ही राजकीय शैली लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे.” भारत संविधानानुसार चालेल, कोणत्याही कट्टर विचारसरणीच्या हुकुमावर नव्हे असेही खरगे म्हणाले.
.@narendramodi जी,
NCRB रिपोर्ट के अनुसार, 2013 से 2023 के बीच —
🔺 दलितों के खिलाफ़ अपराधों में 46% की बढ़ोतरी हुई है
🔺 आदिवासियों के खिलाफ़ 91% अपराध बढ़ें हैं।हरियाणा में IPS अधिकारी से जातिगत भेदभाव,
हरिओम वाल्मीकि की प्रताड़ना,
CJI पर हमला और उसको जायज़ ठहराने की… pic.twitter.com/3XKm8dCQCe— Mallikarjun Kharge (@kharge) October 10, 2025