सत्ता येते-जाते, तुम्ही भाजपचे गुलाम का बनताय? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला इशारा

आम्ही निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी वेळ मागितला. ज्या व्यक्तीमार्फत वेळ मागितला गेला तो अनधिकृत आहे, असे सांगून निवडणूक आयोगाने आमचा अपमान केला, असा संताप काँग्रेसच्या पवन खेडा यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर आम्हाला जाणवले की आम्ही चुकीच्या पत्त्यावर गेलो आहोत. निवडणूक आयोगाला स्वतःच्या इमारतीत बसण्याची गरज नाही. भाजपचे एक मोठे मुख्यालय आहे, त्यांनी तिथे एक मजला व्यापून तिथे बसावे. निवडणूक आयोग मध्यस्थ असेल तर, आम्ही मध्यस्थांना का भेटावं? आम्ही थेट भाजपशी बोलू, अशी टीका पवन खेडा यांनी केली.

पण निवडणूक आयोग कोणत्याही पक्षासाठी मध्यस्थ होऊ शकत नाही. प्रत्येकाने त्यांच्या मर्यादेत काम करावे, ही लोकशाहीची व्याख्या आहे. सत्ता येते आणि जाते. तुम्ही भाजपचे गुलाम का बनताय? असा सवाल करत पवन खेडा यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला.