
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित तक्रारी मिळाल्या नाहीत, असा दावा केला होता. मात्र काँग्रेसने ८९ लाख तक्रारी सादर केल्याचा दावा करत आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, “काँग्रेसने आतापर्यंत निवडणूक आयोगाला ८९ लाख तक्रारी सादर केल्या आहेत, पण आयोगाने त्यांची कोणतीही पावतीही दिलेली नाही.” ते पुढे म्हणाले, “बूथ स्तरावरील एजंटकडून तक्रारी स्वीकारण्यास आयोग नकार देत आहे. तक्रारी वैयक्तिकरित्या घेतल्या जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्पष्ट संकेत आहे की, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सत्ताधारी शक्तींचा दबाव आहे आणि तक्रारी नोंदवल्या जाऊच नयेत, म्हणून हे केले जात आहे.”
पवन खेरा म्हणाले की, “जेव्हा आमचे बीएलए तक्रारी घेऊन जातात, तेव्हा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. त्यांना सांगितले जाते की, आम्ही लोकांकडून स्वतः तक्रारी घेऊ. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष आणि बीएलएची भूमिका काय आहे? उद्या १ सप्टेंबर आहे, निवडणूक आयोगात एसआयआर अंतर्गत तक्रारी दाखल करण्याची शेवटची तारीख. अशा परिस्थितीत आमच्या बीएलओंनी बिहारमधील नागरिकांचे अर्ज नोंदणीकृत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. बीएलओंनी सर्वांचे अर्ज गोळा केले आहेत आणि जिल्हाध्यक्षांमार्फत डीईओकडे सादर केले आहेत.”
चुनाव आयोग अपने 'सोर्स' के माध्यम से खबरें प्लांट करवाता रहता है कि किसी राजनीतिक पार्टी से कोई शिकायत नहीं आ रही है।
सच्चाई ये है कि कांग्रेस पार्टी ने 89 लाख शिकायतें चुनाव आयोग को दी हैं।
जब हमारे BLAs शिकायत लेकर जाते हैं, तो उनसे शिकायतें नहीं ली जाती। उनसे कहा जाता है… pic.twitter.com/l2xVuu0c99
— Congress (@INCIndia) August 31, 2025