
ओडिशामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या आमदारांवर काँग्रेसने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षाचा व्हिप डावलून विरोधी उमेदवाराला मतदान (क्रॉस-व्होटिंग) करणाऱ्या तीन आमदारांना काँग्रेसने पक्षातून तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र आमदार रमेश जेना, दशरथ गमांगो आणि सोफिया फिरदौस या तिघांनी पक्षाचा आदेश धाब्यावर बसवत भाजप पुरस्कृत उमेदवाराला मतदान केले. या गद्दारीमुळे काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
आमदारांच्या या कृत्याची गंभीर दखल घेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने स्पष्ट केले की, “पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात कोणतेही स्थान नाही. या तिन्ही आमदारांनी वैयक्तिक फायद्यासाठी लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली आहे.”
केवळ निलंबनावरच न थांबता, या आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस आता विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागणार आहे. पक्षाचा व्हिप डावलून मोडल्यामुळे या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
ଦଳର ହ୍ୱିପ ବିରୋଧରେ ଯାଇ କ୍ରସ୍ ଭୋଟିଂ କରିଥିବା ସାନ ଖେମୁଣ୍ଡି ବିଧାୟକ ରମେଶ ଜେନା, ବାରବାଟୀ କଟକ ବିଧାୟିକା ସୋଫିଆ ଫିରଦୋଷ ଓ ମୋହନା ବିଧାୟକ ଦାଶରଥି ଗମାଙ୍ଗଙ୍କୁ ଦଳୀୟ ଶୃଙ୍ଖଳା ଭଙ୍ଗ କରିବା ଓ ବିଜେପି ପର୍ଥିଙ୍କୁ ସମର୍ଥନ କରିବା କାରଣରୁ କଂଗ୍ରେସ ଦଳରୁ ନିଲମ୍ବନ କରାଗଲା।
Ramesh Jena, MLA of Sana Khemundi, Sofia… pic.twitter.com/VQAt3HAsrP
— Odisha Congress (@INCOdisha) March 17, 2026


























































