तुझ्यासारखा बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये! Delhi मेट्रोमध्ये कपलचं भांडण, Video व्हायरल

दिल्ली मेट्रो गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. चर्चेच कारण ठरतायत दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणारे दिल्लीकर. कारण मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या दिल्लीकरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायत. यामध्ये भांडणांच्या व्हिडीओंची संख्या सर्वाधिक आहे. असाच एका कपलचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. तुझ्यासारखा बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये असं म्हणत, प्रेयसीने प्रियकराला सर्वांच्या समोर धोपटून काढलं आहे.

दिल्लीकरांसाठी मेट्रोचा प्रवास एकप्रकारे मनोरंजनाचं साधन झाला आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये दिल्ली मेट्रोतले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मनोरंजनाच साधन ठरले आहेत. गाणी गातानाचे, धक्का लागला म्हणून एकमेकांना शिव्या घालण्याचे, जागेवरून भांडणांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जागेच्या वादावरून दोन महिला एकमेकांना भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, आता एका कपलचा भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांना मारताना दिसत आहे. तसेच तुझ्यासारखा बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये असं सुद्धा ती तरूणी मेट्रोमधून उतरता उतरता म्हणाल्याचे दिसून येत आहे.