
दिल्ली उच्च न्यायालयाने गायक हनी सिंग आणि बादशाहला अश्लील गाण्यावरून चांगलेच फटकारले आहे. गाण्याचे शीर्षक आणि बोल इतके आक्षेपार्ह आहेत की, ते अधिकृत आदेशात लिहिणेदेखील शक्य नाही. गुगल, यूटय़ूब आणि स्पॉटिफायसारख्या सर्व संगीत आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवरून या गाण्याची मूळ आवृत्ती, रीमिक्स आणि यूआरएल तत्काळ ब्लॉक केले जावे, असे निर्देश हायकोर्टाने दिले.




























































