
सरकारने मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे उद्धाटन केले. 20 वर्षे या महामार्गावर खड्डे पडणार नाहीत असा दावा सरकारने केला होता. मात्र सरकारचा हा दावा अवघ्या एक वर्षातच फोल ठरला आहे. महामार्गाला मोठे तडे गेले आहेत. छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या माळीवाडा इंटरचेंजनजीक महामार्गाला 3 सेमी रुंदी आणि 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत.
माळीवाडा इंटरचेंजजवळ समृद्धी महामार्गावर मोठा खड्डाही पडला आहे. यामुळे समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता आहे. महामार्ग बनवण्यासाठी एम-40 ग्रेडचे सिमेंट वापरण्यात आले असून यामुळे सुमारे 20 वर्षी तरी महामार्गावर पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता. मात्र वर्षभरातच एमएसआरडीसी आणि सरकारचे पितळ उघडे पडले आहे.