
“महामार्गांवरील सध्याची टोल वसुली प्रणाली पुढील एक वर्षात बंद केली जाईल आणि त्याऐवजी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक, अडथळारहित टोल प्रणाली आणली जाईल”, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. लोकसभेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
नितीन गडकरी म्हणाले आहेत की, “ही नवीन प्रणाली १० ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि एका वर्षाच्या आत देशभरात ती लागू करण्याचे लक्ष्य आहे.”
गडकरी सभागृहाला असेही म्हणाले की, “देशात ४,५०० महामार्ग प्रकल्प सुरू आहेत, ज्यांचा एकूण खर्च अंदाजे १० लाख कोटी रुपये आहे. मोठ्या प्रमाणात महामार्ग बांधणी, डिजिटल टोलिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसह, हिंदुस्थानातील रस्ते वाहतूक आणि वाहतुकीला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे, तसेच वेळेची बचत देखील होईल.”



























































