
राजा रवी वर्मा यांची प्रसिद्ध ‘यशोदा आणि कृष्णा’ यांची पेंटिंग तब्बल 167 कोटी रुपयांना विकली गेली आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या एका लिलावात या पेंटिंगला विक्रमी भाव मिळाला आहे. ही पेंटिंग सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस. पूनावाला यांनी सॅफ्रनआर्ट स्प्रिंग लाइव्ह अँड ऑनलाइन लिलावातून खरेदी केली आहे. रवी वर्मा यांची ‘यशोदा आणि कृष्ण’ ही 1890 च्या दशकातील ऑइल पेंटिंग आहे. या पेंटिंगची मूळ किंमत 80 ते 120 कोटी रुपये ठेवण्यात आली होती. ‘यशोदा आणि कृष्ण’ ही ऑइल पेंटिंग लिलावात विकल्या गेलेल्या आधुनिक हिंदुस्थानी कलेतील सर्वात महागडी पेंटिंग बनली आहे. यापूर्वी सर्वात महागडी एम.एफ. हुसेन यांची ‘अनटाइटल्ड’ पेंटिंग किरण नादर यांनी 118 कोटी रुपयांना खरेदी केली होती.

























































