
इंडिया फर्स्ट लाइफ
खासगी जीवन विमा पंपनी इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स लिमिटेडने कर्जदार आणि सहकर्जदारांना ग्रुप व्रेडिट लाइफ मायक्रो इन्शुरन्स कव्हर उपलब्ध करण्यासाठी नॅबफिन्ससोबत पार्टनरशिप केली. या वेळी इंडिया फर्स्ट लाइफचे सीईओ ऋषभ गांधी उपस्थित होते.
स्क्रिपबॉक्सची सेवा
म्युच्युअल फंड अॅप स्क्रिपबॉक्सने म्युच्युअल फंडसाठी गुंतवणूक सल्ला सेवा सुरू केली. अॅपच्या माध्यमातून मासिक शुल्क देणाऱ्या सर्व ग्राहकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे. या वेळी स्क्रिपबॉक्सचे संस्थापक संजीव सिंगल उपस्थित होते.
मॅकडोनाल्डसची थीम
मॅकडोनाल्डस इंडियाने ‘फ्लेवर्स ऑफ इंडिया’ थीम लाँच केली. याद्वारे बर्गर्समध्ये आकर्षक नवीन ट्विस्टची भर घातली. हे बर्गर्स आता फ्लेवर्स ऑफ इंडिया मॅकआलू टिक्की बर्गर, फ्लेवर्स ऑफ इंडिया मॅकवेजी बर्गर आणि फ्लेवर्स ऑफ इंडिया मॅकचिकन बर्गर या नावांनी उपलब्ध असतील.
आइस मेकचा महसूल
आइस मेक रेफ्रिजरेशन लिमिटेडच्या महसुलात 7.58 टक्के वाढ झाली. गेल्या वर्षीच्या 79.31 कोटींच्या तुलनेत या वर्षी 85.33 कोटी रुपयांची वाढ झाली. खर्चात वाढ झाल्यामुळे या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 32 टक्के घसरून 3.64 कोटी रुपयांवर आला आहे.
टाटा मोटर्सची कर्व्ह ईव्ही कार लाँच
टाटा मोटर्सने कर्व्ह ईव्ही कार लाँच केली. कारमध्ये कंपनीने सर्वात मोठी बॅटरी पॅक दिली आहे. कंपनीने 45 केडब्लूएच बॅटरीसाठी 17.49 लाख रुपये आणि 55 केडब्लूएच बॅटरीसाठी 19.25 लाख रुपये किंमत ठेवली आहे. या कारची बुकिंग 12 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, तर डिलिव्हरी 23 ऑगस्टपासून सुरू होईल. 55 केडब्लूएचसाठी सिंगल चार्जमध्ये 585 किमीची, तर 45 केडब्लूएचसाठी 502 किमीची रेंज दिली आहे. कारमध्ये 2 पेट्रोल इंजिन आणि 1 डिझेल इंजिन ऑप्शन दिले आहेत. कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत.
एअर इंडिया फ्लाइंग रिटर्न्सवर बक्षीस
एअर इंडिया आणि मर्लिन एंटरटेन्मेंट यांच्यात पार्टनरशिप झाली असून याअंतर्गत एअर इंडिया फ्लाइंग रिटर्न्स लॉयल्टी कार्यक्रमांतर्गत सदस्यांना लेगोलँड थीम पार्कसाठी तिकीट खरेदीनंतर बक्षीस पॉइंट मिळणार आहे. हे खास 2 ते 12 वर्षांतील मुलांसाठी तयार करण्यात आले आहे. यूके, न्यूयॉर्क, पॅलिपहर्निया, दुबई आणि मलेशियात खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांवर 10 बक्षीस पॉइंट मिळणार आहेत. या वेळी एअर इंडियाचे मार्पेटिंग, लॉयल्टी आणि ई-कॉमर्स प्रमुख सुनील सुरेश उपस्थित होते.
रिलायन्स ज्वेलर्सचे आभार कलेक्शन
रिलायन्स ज्वेलर्सने ज्वेलरी ब्रँडला 17 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांसाठी खास आभार कलेक्शन सादर केले आहे. देशातील 200 हून अधिक शहरांतील 400 हून अधिक स्टोअर्समध्ये आभार कलेक्शन उपलब्ध आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या आणि हिऱ्यांच्या घडणावळीवर 17 टक्के डिस्काऊंट दिले जात आहे. तसेच 2 सप्टेंबरपर्यंत 5 लाखांवरील बिलावर अतिरिक्त 5 टक्के सूट दिली जाणार आहे.
महाराजा कंपनीची नवी अगरबत्ती
महाराजा अगरबत्ती कंपनीने व्हाईट सेज आणि विरा प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. या अगरबत्तीच्या मनमोहक सुगंधाने देवाची प्रार्थना करताना मन अगदी प्रसन्न राहते. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. महाराजा पंपनीची अगरबत्ती खरेदी करताना पंपनीचा लोगो पाहून खरेदी करावे असे कंपनीने म्हटले आहे. संपर्क – 8369185071.
हीना अगरबत्ती आणि धूप बाजारात!
निखिल प्रोडक्टस बंगळुरूच्या अगरबत्ती कंपनीने श्रावण, गणपती, दसरा, दिवाळी या सणांचे औचित्य साधून हीना अगरबत्ती आणि हीना धूप बाजारात आणले आहे. हीना अगरबत्ती नैसर्गिक सुगंधी द्रव्य आणि हलमडीपासून तयार केली आहे. 50 ग्रॅम (225 रुपये) आणि 250 ग्रॅम (1075 रुपये) अशा आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे.