
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर विमानांमधील सुरक्षित प्रवासासाठी सेफ्टी ऑडिट सुरू करण्यात आले. यादरम्यान, अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील अनेक विमानतळांवर एक विमान पंपनी प्रवाशांच्या जिवाशी खेळ करून झिजलेल्या टायर्ससह उड्डाण करत असल्याचे उघड झाले. तसेच अनेक गंभीर गोष्टी डीजीसीएच्या ऑडिटमधून समोर आल्या.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर देशभरातील विविध विमनतळे, विमान पंपन्या आणि एव्हिएशन सेंटरशी संबंधित सेवांचे स्पेशल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले होते, अशी माहिती डीजीसीएच्या अधिकाऱयांनी दिली. दिल्ली आणि मुंबईसह विविध विमानतळांवर सकाळी आणि सायंकाळी पीक अवर्समध्ये ऑडिट करण्यात आले. ज्या विमानांमध्ये तांत्रिक बिधाड आढळले ते दूर करण्यासाठी विमान पंपन्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली नाहीत. विमानाच्या हिशेबाने सॉफ्टवेअर अपडेट नसल्याचे आढळून आले.