
भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार व्हायला लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी वर्षभरात 177 फोन कॉल केल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरातशी 17 वेळा फोनवरून संपर्क साधल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
रुपाली चाकणकर यांच्या बहिणीनेही अशोक खरातला तब्बल 236 वेळा कॉल केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.आपल्याला एका अनोळखी व्यक्तीकडून अशोक खरातचा सीडीआर प्राप्त झाला. त्यानुसार रुपाली चाकणकर आणि खरातमध्य वर्षभरात 33 हजार 727 सेपंद, म्हणजेच सुमारे 9 तास 36 मिनिटे संभाषण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 8 वेळा अशोक खरातशी संपर्क साधला होता, असे दमानिया म्हणाल्या.




























































