मनावरचा ताण हलका करण्यासाठी डान्स थेरपी आहे सर्वात उत्तम, जाणून घ्या

डान्स करणं ही एक कला आहे. परंतु याउपरही डान्स ही एक थेरपी आहे. तुम्हाला तणाव, चिंता किंवा दुःख वाटत असेल तर नाचणं हा एक बेस्ट पर्याय आहे. डान्समुळे आपण तणावापासूनही दूर राहतो हे आता संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे. डान्स करण्यामुळे आपल्या शरीरामध्ये ‘सेरोटोनिन’ या फील गूड हार्मोन्सची पातळी वाढते. शरीरामध्ये फील गुड हार्मोन्सची वाढ झाल्यामुळे, आपण मानसिक ताण तणावावर मात करु शकतो.

सकाळी हरभरा खाण्याचे अगणित फायदे, वाचा

वजन कमी करण्यासाठी डान्स हा एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. डान्स केल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी खूप सारे फायदे मिळतात. डान्समुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते. तसेच शरीर लवचिक होण्यासही मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी डान्स हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी प्रमाणात संभवतो.

आहारात मासे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

डान्स करण्यामुळे सर्व शरीराचा योग्य तो व्यायाम होतो. हाडे आणि स्नायूंच्या दैनंदिन दुखापती पासून दूर राहण्यासाठी, तसेच सांधेदुखी कमी करण्यासाठी डान्सची मदत होते. लहानपणापासूनच डान्स शिकण्यास सुरुवात केली तर अतिशय उत्तम. जेणेकरून शरीर लवचिक होते. डान्स करणे हा मेंदूसाठी उत्कृष्ट व्यायाम आहे. नृत्याची मदत खूपच होते. एरोबिक नृत्यामुळे अनेकजण स्वतःचे वजन उत्तम काम करतात.

नृत्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच नृत्य लिपिड नियंत्रणात आणण्यासही  मदत करते. ज्यामुळे आपली कोलेस्टेरॉलची खराब पातळी कमी करण्यास मदत करते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात डान्स हे सर्वात प्रभावी मानले जाते.

आहारात मासे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

असे म्हणतात की, आनंदी राहण्यामुळे आरोग्याशी संबंधित निम्म्या समस्यां आपल्यापासून दूर राहतात. नृत्य आनंद देते. तसेच आपले भावनिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. त्यामुळे आता तुम्हालाही तणावावर आणि चिंतेवर मात करायची असेल तर, आजच डान्स शिकायला घ्या.