
दापोली शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नगर पंचायतीने रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत रस्त्यातील खड्डे बुजवून टाकण्याचे काम सुरू केले. मात्र सजग नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी प्रश्नांची सरबती करत नगर पंचायतीच्या कारभाराची चांगलीच पोलखोल करत सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले.
दापोली शहर वासीयांच्या नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने सत्ताधाऱ्यांचे सत्तांतराचे पितळ उघडे पडत चालले होते. नगर पंचायतीने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून टाकण्याचे महत्वाचे काम हाती घेतले. मात्र रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम चक्क रात्री साडे आठ नंतर सुरू करण्यात आले.रात्रीच खड्डे मुक्त रस्ते झाले तर गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या दिवशी वा उत्सव काळात तरी अगदी हसत हसत सर्वांना समोरे जाता येईल मात्र रात्रीच्या अंधारात खड्डे भरण्याचे काम सुरू असताना योगायोगाने या मार्गावरून दापोली तालूका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर हे दापोलीकडे काही कामानिमित्त येत असताना त्यांना रात्रीच्या अंधारात खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपल्या वाहनातून खाली उतरून कामगारांकडे चौकशी केली. सिमेंटचा अभाव असलेली नुसतीच खडी वाळू पायाने खोदून पाहीली त्यानंतर कामागारांकडे खात्री केली. त्यांना विश्वासात घेऊन विचारले मात्र कामगार दबावाखाली होते अंधारात रस्ता सुस्थितीत करता येईल का ? एक दिवस थांबलात तर अजून एक दिवस जाईल किमान दिवसा व्यवस्थित काम करता येईल नाही का चालणार? मात्र कामगाराकंडे याची उत्तरंच नव्हती.
यापासून नगरपंचायत प्रशासनाला पळ काढता येणार नाही. प्रश्न जन हिताचा आहे तुम्ही कसेही वागाल वा काहीही कराल हे चालणार नाही चालवून घेतले जाणार नाही कारण हा पैसा शासनाचा आहे आंम्ही करदाते आहोत आमच्या पैशाचा योग्य तो विनियोग झालाच पाहिजे असे शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी ठणकावून सांगितले.