
उत्तर प्रदेशातील बस्तर जिह्यात एक धक्कादायक घटना घडली. एका खासगी हॉस्पिटलने 22 दिवस एका मृत नवजात बाळावर आयसीयूमध्ये उपचार केले आणि लाखो रुपये उकळले, असा आरोप बाळाच्या पुटुंबियांनी केला. सुरुवातीला आयुष्मान कार्डने उपचार सुरू झाले आणि नंतर मुलाच्या पुटुंबाकडून दोन लाख रुपये घेण्यात आले, असाही आरोप आहे.
पुटुंबियांच्या म्हणण्यानासर, मुलगा गंभीर आजारी होता. त्याला चांगले उपचार मिळावेत, म्हणून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलावर 22 दिवस उपचार सुरू राहिले. परंतु या काळात डॉक्टरांच्या हेतूवर आणि उपचारांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. मुलाची प्रपृती सातत्याने खालवत होती. मुलगा मरण पावला तरी त्याला आयसीयूमध्ये ठेवून खोटे उपचार करण्यात आले.
पत्नीचे सर्व दागिने विकले
रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी आणि मुलाला वाचवण्यासाठी मुलाच्या वडिलांना त्यांच्या पत्नीचे सर्व दागिने विकावे लागले. पालकांनी आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी जे काही मागितलं ते दिले. शेतही गहाण ठेवले. परंतु असे असूनही, रुग्णालयाने मुलाच्या पुटुंबाकडून पैसे उकळले. या प्रकरणाबाबत सीएमओ राजीव निगम यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी एक टीम तयार केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले.