
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिकांना दिलेल्या सुचनेनूसार, दुबार मतदार व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी 27 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. तर आता मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी 3 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महानगरपालिका निहाय संपूर्ण मतदारयादी जसजशी पूर्ण होईल तसतशी प्रसिद्ध करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.






























































