येमेनमधील हिंदुस्थानी नर्स निमिषाची फाशी तूर्त टळली

येमेन जेलमध्ये बंद असलेली हिंदुस्थानी नर्स निमिषा प्रिया हिची फाशी तूर्तास टळली आहे. निमिषाला 16 जुलैला फाशी देण्यात येणार होती, परंतु ही फाशी येमेनमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी टाळली आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. हिंदुस्थानी अधिकारी स्थानिक जेल अधिकारी आणि जेल प्रशासनाच्या संपका&त आहेत. फाशीची शिक्षा तूर्तास टळली असल्याने प्रियाचे पुटुंब आणि पीडित पुटुंब यांच्यात वाटाघाटीला वेळ मिळू शकणार आहे. सुन्नी मुस्लिम धर्मगुरू निमिषाची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी पीडित पुटुंबाला ब्लड मनी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.