हा पुरस्कार मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मोहनलाल यांची पहिली प्रतिक्रिया

सुप्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कात मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित करतो अशी प्रतिक्रिया मोहनलाल यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना मोहनलाल म्हणाले की, अतिशय नम्रतेने आणि कृतज्ञतेने मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. हा पुरस्कार मल्याळम चित्रपटसृष्टीसाठी आहे, तिच्या परंपरेसाठी आहे, तिच्या कलात्मकतेसाठी आहे. हा आमच्यासाठी एक मोठा क्षण आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठ्या क्षणांपैकी एक आहे, असे मला वाटते. मी कधीही याबद्दल विचार केला नव्हता. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल परीक्षक मंडळाचे आणि सरकारचे मनःपूर्वक आभार. हा पुरस्कार मी मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित करतो. तसेच माझ्यासोबत काम केलेल्या प्रत्येकाला, ज्यांनी मला घडवलं, सर्व कलाकारांना, दिग्दर्शकांना, सहकाऱ्यांना आणि माझ्या कुटुंबाला, माझ्या आईवडिलांनाही हा पुरस्कात समर्पित करतो असेही मोहनलाल म्हणाले.