‘विप्रो’ नामांकित ट्रेडमार्क, हायकोर्टाचा कंपनीला दिलासा

शिवम उद्योग विप्रो वायर मेष या चिन्हाच्या नोंदणीमुळे ट्रेडमार्कचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या विप्रो कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. विप्रो नामांकित ट्रेडमार्क असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी विप्रो कंपनीचा युक्तिवाद ग्राह्य धरला आहे.

विप्रो एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड 1977 पासून अखंडपणे या चिन्हाचा वापर करत असून कंपनीने बरीच प्रतिष्ठा मिळवली आहे. विप्रोच्या चिन्हासाठी कंपनीने विविध ठिकाणी नोंदणी केली आहे. ‘विप्रो’ डिव्हाइस चिन्हासाठी सर्वात आधी 1991 मध्ये नोंदणी झाली होती. इतकेच नव्हे तर विप्रोने अमेरिका, युके, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, फिलीपिन्स, ब्राझील, कॅनडा, मलेशिया, मेक्सिको आदी देशांमध्ये ट्रेडमार्क नोंदणी केली आहे. याशिवाय विप्रो या ट्रेडमार्कअंतर्गत विविध पुरस्कार कंपनीला मिळाल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केले आहे.