दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर पडलं भगदाड, वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते उद्घाटन

सामान्यतः रस्त्यांवर खड्डे पडतात. पण दिल्ली मुंबई महामार्गावर मोठं भगदाड पडलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्षभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महामार्गाचे उद्घाटन केले होते. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी धावून आले आणि रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू केले.

राजनस्थानच्या दौसा भागातून दिल्ली मुंबई महामार्ग जातो. या मार्गावर मोठं भगदाड पडलं. हे भगदाड इतकं मोठं होतं की एखादी गाडी यात पुर्णपणे पडून जाईल. या घटनेची माहिती मिळताच प्रशासानाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी सर्वप्रथन इथली वाहतूक दुसरीकडे वळवली. तसेचा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. या महामर्गाचे उद्घाटन गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक आहे असे सांगितले जाते, कारण आतापर्यंत या मार्गावर अपघातात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.