Delhi News – हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, पाच जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू

दिल्लीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये छत आणि भिंतीचा काही भाग कोसळला आहे. यावेळी अनेक जण आतमध्ये उपस्थित होते. या दुर्घटनेत पाच जण दगावले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 3 महिलांचा आणि 2 पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तसेच 11 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायंकाळी 4.30 च्या दरम्यान नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती मिळाल्याच दिल्ली अग्निशामन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच 5 फायर टेंडर घटनास्थळी पाठवून मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे.