
राज्यातील निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या मानधनात 5 हजारांपर्यंत तर वयोमर्यादेत 75 वर्षांपर्यंत वाढ केली जावी, अशी मागणी सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभागृहात केली. या योजनेखाली पात्र होणाऱ्या कुटुंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 1,500/- प्रतिमहा तर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असले तरीदेखील प्रति लाभार्थी रुपये 1,500/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जात आहे, परंतु महागाईच्या पार्श्वभूमीवर अनुदानात वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली.