खरातला नीलम गोऱ्हे भेटल्याची माहिती शिंदेंच्या लोकांनीच दिली, तृप्ती देसाई यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
trupti-desai-bhumata-brigade

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भोंदू अशोक खरात याच्याबरोबर नाशिकमधील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. गोऱ्हे यांना जेव्हा आमदारकी, मंत्रीपद हवे होते तेव्हाही त्या अशोक खरातला भेटायला गेल्या होत्या. गोऱ्हे यांच्याबरोबर शिंदे गटाशी संबंधित पदाधिकारी व इतर लोक गेले होते. त्यांनीच मला ही माहिती दिली आहे. हे साक्षीदार आमच्याकडे आहेत. याचे पुरावे योग्य वेळी सादर केले जातील, अशी माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिली.

तृप्ती देसाई यांचे आरोप गोऱ्हे यांनी फेटाळले होते. आज तृप्ती देसाई यांनी मी जे आरोप केले आहेत, त्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. मला ज्यांनी माहिती दिली त्यातील एक व्यक्ती नाशिक, तर दुसरी पुण्याची आहे. या लोकांनी मला हे प्रकरण एसआयटी आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जात नाही, तोपर्यंत आमचे नाव घेऊ नका असे सांगितले आहे, असे देसाई म्हणाल्या.