इराणच्या ड्रोनहल्ल्यात मुंबईकर देवानंद प्रसाद यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धात मुंबईकर मरीन इंजिनीअर देवानंद प्रसाद सिंह हे मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकन कंपनीच्या सेफसी विष्णू या जहाजावर गुरुवारी इराकच्या बसरा येथील बंदरात हल्ला झाला. त्या हल्ल्यात देवानंद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. सेफसी विष्णू हे अमेरिकेतील सेफसी ट्रान्सपोर्ट कंपनीचे तेलवाहू जहाज असून देवानंद प्रसाद हे या जहाजावर अतिरिक्त मुख्य अभियंता म्हणून काम करत होते. खोर अल झुबैर बंदरात हे जहाज उभे असतानाच त्यावर इराणने ड्रोनहल्ला केला.