
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा बसला असून आज मंगळवारी मतदान पार पडणार आहे. एकूण १७ प्रभाग व नगराध्यक्ष पदासाठी हे मतदान होणार असून नगराध्यक्ष पदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी ६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीसाठी एकूण १०७८९ इतके मतदार असून यामध्ये ५२०८ पुरूष तर ५५८१ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याची दोरी महिला मतदारांच्या हाती असणार आहे. महिला मतदारांचा वाढता सहभाग निवडणूक प्रक्रियेत विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
१७ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. आजच्या मतदानात नगराध्यक्ष आणि १७ प्रभागातील नगरसेवकांचे भवितव्य ईव्हिएममध्ये बंद होणार आहे. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अमृता साबळे व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. देवरूख नगरपंचायत सार्वत्रिक निव २०२५ करिता मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत. यावर्षी प्रत्येक मतदान केंद्रावर एक कंट्रोल युनिट आणि एक बॅलेट युनिट उपलब्ध राहणार आहे.
देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये, महाविकास आघाडीकडून उबाठाच्या सौ. सबुरी थरवळ, आपकडून सौ. दिक्षा खंडागळे, अपक्ष स्मिता लाड व अपक्ष वेदीका मोरे असे एकूण ५ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडणुक रिंगणात आहेत. तर १७ प्रभागांसाठी तब्बल ६५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. देवरूख नगरपंचायतची निवडणुक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे. या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाई यांची महायुती तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस व जनता दल यांची महाविकास आघाडी तर आम आदमी पक्ष व गावविकास समिती एकत्र झाले आहेत. तसेच गावविकास पॅनेल ही निवडणुक स्वतंत्रपणे लढवत आहे. नगराध्यक्षपदासाठी ५ व नगरसेवक पदासाठी ६५ असे एकूण ७० उमेदवार निवडणुक रिंगणात उभे राहिले आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी आणि १७ प्रभाग असे मिळून १८ जागांसाठी तब्बल ७० उमेदवार निवडणुक रिंगणात उभे आहेत. हे सर्व उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमवणार आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनसह आवश्यक साहित्य आणि अधिकारी-कर्मचारी संबंधित मतदान केंद्रात दार आहेत. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी अमृता साबळे यांनी मतदान पथकांना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले उपस्थित होते. पोलीस प्रशासनाकडून मतदान केंद्राची रचना, सीसीटीव्ही नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, निवडणूक पूर्व व निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. नाकाबंदीत संशयित वाहनांची झाडाझडती घेण्यात येणार असून, फिरत्या पथकांमार्फत देखील गैरकृत्यांवर नजर ठेवून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी सांगितले.
देवरूखमध्ये एकूण १७ मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान होणार असून अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांच्यासह १०० हून अधिक जणांची नेमणूक करण्यात आली आहे. नगरपंचायतीचे १७ प्रभाग असून प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, पोलींग ऑफीसर ३, झोनल अधिकारी ३, शिपाई १, पोलीस १ अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधिकारी ५, पोलीस कर्मचारी ५०, होमगार्ड ४० अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता पथक व भरारी पथक कार्यरत असणार आहे. ईव्हीएम मशीन आणि आवश्यक निवडणूक साहित्य संबंधित मतदान केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले असून मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण असून मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, पोलींग ऑफीसर ३, झोनल अधिकारी ३, शिपाई १, पोलीस १ अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधिकारी ५, पोलीस कर्मचारी ५०, होमगार्ड ४० अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता पथक व भरारी पथक कार्यरत असणार आहे. ईव्हीएम मशीन आणि आवश्यक निवडणूक साहित्य संबंधित मतदान केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले असून मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण असून मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
गुहागर नगरपंचायतसाठी ५ हजार ९६१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क, २ हजार ८५६ पुरुष तर ३ हजार १०५ स्त्री मतदार
गुहागर नगरपंचायत निवडणूकिसाठी येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून येथील मतदार देखील आपला निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी तयार आहेत. या निवडणुकीसाठी १७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नगराध्यक्ष निवडणूकीची लढत चौरंगी तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ४० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
गुहागर नगरपंचायत निवडणूकिमध्ये एकूणत १७ मतदान केंद्र असून ५ हजार ९६१ एकूण मतदार आहेत. यामध्ये २ हजार ८५६ पुरुष तर ३ हजार १०५ स्री मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये एकात्मिक बाल विकास योजना अंगणवाडी बाग या मतदान केंद्रात २६४ पुरुष तर २५९ स्री असे एकूण ५२३ मतदार, प्रभाग क्रमांक २ मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. २ खोली नं. 1 या मतदान केंद्रात १९३ पुरुष तर २१० स्री असे एकूण ४०३ मतदार, प्रभाग क्रमांक ३ मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. २ खोली नं.२ या मतदान केंद्रात १८८ पुरुष तर १९४ स्री असे एकूण ३८२ मतदार, प्रभाग क्रमांक ४ मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. २ खोली नं. १ (नारायण मंदिर शेजारी) या मतदान केंद्रात १७४ पुरुष तर १९९ स्री असे एकूण ३७३ मतदार, प्रभाग क्रमांक ५ मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. २ खोली नं. २ (नारायण मंदिर शेजारी) या मतदान केंद्रात १५२ पुरुष तर १५७ स्री असे एकूण ३०९ मतदार, प्रभाग क्रमांक ६ मध्ये श्रीमती अन्नपूर्णा प्राथमिक विद्यालय गुहागर या मतदान केंद्रात १५० शेजारी) या मतदान केंद्रात १५२ पुरुष तर १५७ स्री असे एकूण ३०९ मतदार, प्रभाग क्रमांक ६ मध्ये श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय गुहागर या मतदान केंद्रात १५० पुरुष तर १५१ स्री असे एकूण ३०१ मतदार, प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य आणि कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात १४९ पुरुष तर १५२ स्री असे एकूण ३०१ मतदार, प्रभाग क्रमांक ८ मध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य आणि कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात १६४ पुरुष तर १३८ स्री असे एकूण ३०२ मतदार, प्रभाग क्रमांक ९ मध्ये ग. बा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात १९२ पुरुष तर २२३ स्री असे एकूण ४१५ मतदार, प्रभाग क्रमांक १० मध्ये ग. बा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात १३९ पुरुष तर १७१ असे एकूण ३१० मतदार, प्रभाग क्रमांक ११ मध्ये ग. बा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात १७१ पुरुष तर १८६ स्री असे एकूण ३५७ मतदार, प्रभाग क्रमांक १२ मध्ये जीवन शिक्षण शाळा नं.१ या मतदान केंद्रात १३५ पुरुष तर १२2 स्री असे एकूण २५७ मतदार, प्रभाग क्रमांक १३ मध्ये जीवन शिक्षण २ मतदान केंद्रात १२३ पुरुष तर १७५ स्री असे एकूण पुरुष तर १७१ असे एकूण ३१० मतदार, प्रभाग क्रमांक ११ मध्ये ग. बा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात १७१ पुरुष तर १८६ स्री असे एकूण ३५७ मतदार, प्रभाग क्रमांक १२ मध्ये जीवन शिक्षण शाळा नं.१ या मतदान केंद्रात १३५ पुरुष तर १२२ स्री असे एकूण २५७ मतदार, प्रभाग क्रमांक १३ मध्ये जीवन शिक्षण शाळा नं.१ या मतदान केंद्रात १२३ पुरुष तर १७५ स्री असे एकूण २९८ मतदार, प्रभाग क्रमांक १४ मध्ये जीवन शिक्षण शाळा नं.१ या मतदान केंद्रात १५१ पुरुष तर २०५ स्री असे एकूण ३५६ मतदार, प्रभाग क्रमांक १५ मध्ये जि. प. प्राथमिक शाळा जांगळेवाडी गुहागर या मतदार केंद्रात १४९ पुरुष तर १८२ स्री असे एकूण ३३१ मतदार, प्रभाग क्रमांक १६ मध्ये जि. प. प्राथमिक शाळा जांगळेवाडी गुहागर या मतदार केंद्रात २०० पुरुष तर २११ स्री असे एकूण ४११ मतदार, प्रभाग क्रमांक १७ मध्ये अंगणवाडी खोली गुहागर जांगळेवाडी या मतदान केंद्रात १६२ पुरुष तर १७० स्री असे एकूण ३३२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
























































