
धाराशिवमध्ये रस्ता मंजूर होऊनही तो प्रत्यक्षात आला नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा रस्ता अडवला. इतकंच नव्हे तर ध्वजारोहणावेळी एका तरुणाने घोषणाबाजी करत आंदोलनही केले
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असून पालकमंत्री प्रताप सरनाईक जिल्हा दौऱ्यावर होते. खासापुरी गावात रस्ते आणि पाण्यासारखे मूलभूत समस्या असल्याने शंकर तात्या चव्हाण यांनी मंत्री सरनाईक यांचा ताफा अडवला. ध्वजारोहणावेळी चव्हाण यांनी गोंधळ घातला. हा चव्हाण परांडा तालुक्याच्या खासापुरीतला असून विविध मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी गोंधळ घातला. या पोलिसांनी चव्हाण यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
धाराशिव: मंजूर झालेला रस्ता प्रत्यक्षात न आल्याने गावकऱ्यांचा संताप, मंत्री प्रताप सरनाईक यांचा ताफा अडवलाhttps://t.co/RGEXGaxsXO pic.twitter.com/2k9gN2cxFG
— Saamana Online (@SaamanaOnline) September 17, 2025