
अभिनेता रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही दमदार कामगिरी केली आहे. ‘धुरंधर’ने ‘कांतारा चॅप्टर 1’ ला मागे टाकत वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत 872.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’चे वर्ल्डवाईड कलेक्शन 852 कोटी रुपयांचे होते.
‘धुरंधर’च्या देशातील कलेक्शनचा विचार केला तर सोमवारी चित्रपटाने 16 कोटी रुपये कमावले. चित्रपटाची एकूण कमाई 571 कोटी रुपये झाली आहे. देशातील टॉप 10 चित्रपटांच्या यादीत आता ‘धुरंधर’ने स्थान मिळवले आहे. रणवीर कपूरच्या ‘ऑनिमल’ची 10 व्या क्रमांकाची जागा ‘धुरंधर’ने पटकावली आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’चा दुसरा भाग मार्च 2026 मध्ये येणार आहे.


























































