‘धुरंधर’ने गाठला एक हजार कोटींचा पल्ला

‘धुरंधर’ चित्रपटाने आपली बॉक्स ऑफिसवरील जादू कायम ठेवत आता एक हजार कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून हा चित्रपट दिवसेंदिवस नवनवीन विक्रम मोडत आहे. अवघ्या 21 दिवसांत सिनेमाने हा टप्पा गाठला आहे. सिनेमाने जागतिक स्तरावर 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाने हिंदुस्थानात 668.80 कोटी रुपये कमावले आहेत, तर त्याची जागतिक कमाई आता 1,006 कोटी रुपये आहे. चित्रपटाने 21व्या दिवशी स्थानिक पातळीवर अंदाजे 26 कोटी रुपये कमावले, जे त्याच्या पहिल्या दिवसाच्या 28 कोटी रुपयांच्या कलेक्शनच्या जवळपास बरोबरीचे होते, ज्यामुळे देशातील एकूण कमाई 668.80 कोटी रुपये झाली.