इन्स्टाग्रामवर सध्या ‘‘दिल पे छुरिया’ गाण्याचा धुमाकूळ

इन्स्टाग्रामवर सध्या ‘दिल पे चलाई छुरियां…’ या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 1995 मध्ये आलेल्या ‘बेवफा सनम’ या चित्रपटातील हे गाणे आता खूपच ट्रेंड झाले आहे. सुरतमधील राजू भट्ट नावाच्या कलाकाराने हे गाणे गायले आहे. या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे राजूने हातातील दोन छोट्य दगडांनी गाण्याला हटके म्युझिक दिले आहे. या गाण्याच्या व्हिडीओला 16 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यातील राजूच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांमुळे या गाण्याने लाखो लोकांचे मन जिंकले आहे. हे गाणे इन्स्टावर रील म्हणून अनेकांनी शेअर केले आहे. या एका गाण्यामुळे राजू भट्ट हा राजू कलाकार या नावाने प्रसिद्ध झाला आहे.