यशवंतराव नाट्य संकुलातील तालीम हॉलच्या भाड्यात 50 टक्के सवलत

प्रायोगिक रंगभूमीवरील तसेच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे यशवंतराव नाट्य संकुल, माटुंगा येथील तालीम हॉलच्या भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्या नाटकाची तालीम करण्यात येणार आहे. त्या नाटकाच्या संहितेला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रायोगिक नाटक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तसेच सदर नाटकात काम करणारे सर्व कलाकार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य असणे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त संस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.