
एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 किमीपेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. 1 जुलैपासून प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्य योजनाअंतर्गत सवलतधारक प्रवासी तसेच जादा बसेससाठी ही सूट लागू नसेल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. आषाढी एकादशी व गणेशोत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱया प्रवाशांना योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.