बजेट फ्रेंडली भेटवस्तूंची करा निवड

  • आपण दरवर्षी दिवाळीत आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देत असतो. मात्र आपण दिलेली भेटवस्तू लक्षात राहावी म्हणूनच त्याच त्या टिपीकल वस्तूंपेक्षा बजेट फ्रेंडली भेटवस्तूंचे 5 पर्याय पुढीलप्रमाणे –
  • भिंती आणि दारावर टांगण्यासाठी अनेक सजावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही या सजावटीच्या वस्तूंची निवड करू शकता.
  • दिवाळीत दिवे लावण्यासाठी अनेक प्रकारच्या मेणबत्त्या उपलब्ध आहेत. सुगंधी मेणबत्त्या, डिझायनर मेणबत्त्या किंवा तरंगत्या मेणबत्त्या असे पर्याय उपलब्ध आहेत.
  • नातेवाईक किंवा मित्रमंडळींना छान हिरवीगार रोपे भेट म्हणून देऊ शकता.
  • बाजारात किंवा ऑनलाईन गिफ्ट हॅम्पर उपलब्ध असतात. यात सजावट, खाद्यपदार्थ आणि पूजा साहित्य याचा समावेश असतो.
  • सणासुदीच्या काळात घर सुगंधित ठेवण्यासाठी आजकाल अरोमा डिफ्युजर ही लोकप्रिय भेट आहे.