
‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षरा म्हणजेच हिना खान आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. सध्या हिना खान कॅन्सरशी लढा देत आहे, अशातच तिने कुठेही हिंमत न हारता मोठ्या धैर्याने ती सामोरे जात आहे. ती वेगवेगळ्या इव्हेण्टना उपस्थिती लावताना दिसत आहे, शिवाय वेगवेगळे फोटो ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच तिने ट्रेडिशनल लूक मध्ये काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
हिना रविवारी एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाली होती, यावेळी तिने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
मल्टीकलर डीपनेक अनारकली सूटमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती.
या ड्रेसवर तिने बोल्ड मेकअप, नाकात नथ आणि कानात मोठे झुमके घातले होते.
तिने आपले हे फोटो इंस्टावर शेअर करत दिवाळीच्यावेळी देसी स्टाईलने चमकताना अशी फोटोओळ दिली आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा पाऊस पाडला आहे.
सध्या हिना खान तिसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असून त्यावर उपचार घेत आहे.
हिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती आपल्या चाहत्यांशी वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करत कनेक्टेड असते.