
आपल्या दैनंदिन आहारामध्ये काय समाविष्ट केले जात आहे आणि काय नाही, याचा आरोग्यावर परिणाम होतो, त्याचबरोबर खाल्ल्यानंतर तुम्ही अशा चुका करू नका ज्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. जेवणानंतर बहुतांशी लोक ज्या सामान्य चुका करतात. यामुळे आपले पोट खराब होऊ शकते, गॅस किंवा पोटफुगी होऊ शकते आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
जेवणानंतर लगेच कोणत्या 5 चुका करु नयेत
जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नये. चहा किंवा कॉफीमध्ये कॅफिन आणि टॅनिन असतात जे लोहाचे शोषण रोखतात. यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढतो.
तुम्ही जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्यायले तर ते पाचक एंजाइम पातळ करते आणि गॅस किंवा पोटफुगी निर्माण करते.
जेवणानंतर लगेच लोक करत असलेली आणखी एक मोठी चूक म्हणजे जेवणानंतर झोपणे. जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपलात तर त्यामुळे अॅसिड रिफ्लक्स होतो. तसेच या सवयीमुळे वजन वाढते.
जेवणानंतर फळे खाणे योग्य नाही. जेवणानंतर फळे खाल्ल्यास ती आंबायला लागतात, ज्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो.
जेवल्यानंतर लगेच ब्रश करणे ही देखील एक मोठी चूक असल्याचे सिद्ध होते. जेवणानंतर लगेच दात घासले तर तुमच्या दातांचा वरचा थर, म्हणजेच इनॅमल, खराब होऊ शकतो आणि काढून टाकला जाऊ शकतो. म्हणूनच जेवणानंतर किमान अर्धा तासाने दात घासले पाहिजेत.