Video – डोंबिवलीत मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाईचा बडगा; व्हायरल व्हिडीओमुळे वादाची ठिणगी

डोंबिवलीत स्टेशन परिसरात खाद्यपदार्थांचा स्टॉल लावणाऱ्या एका मराठी तरुणीला त्रास दिला जात असल्याचा व तिच्या स्टॉलवर कारवाई झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे वादाची ठिणगी पडली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी लगेचच या तरुणीची भेट घेत तिला धीर दिला.