सिलिंडर मिळेना, त्यात महागाईचा चटका; घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांतील संघर्षामुळे इंधन आणि गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाले आहेत. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 60 रुपयांनी वाढ झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

राज्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून सिलिंडरमध्ये काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा छगन भुजबळ यांनी दिला. पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. घरगुती सिलिंडरचे वितरण सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही वितरकांना देण्यात आल्या आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले.

राज्य सरकारने विधीमंडळात ही माहिती दिली असली तरी अनेक ठिकाणी सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांवर रांगा लावण्याची वेळ आली आहे. ऑनलाईन बुकिंग करूनही सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. घरगुती गॅसचा पुरेसा साठा असल्याचे सरकार सांगत आहे, मग गॅस सिलिंडर वेळेवर का मिळत नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.