हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तात्काळ शस्त्रसंधीसाठी आम्ही मदत केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तात्काळ शस्त्रसंधीसाठी आम्ही मदत केली, असा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. ट्रम्प म्हणाले की, “आम्ही हिंदुस्थान आणि पाकिस्तानला सांगितले होते की, जर संघर्ष थांबला नाही तर आम्ही व्यापार करणार नाही.”

ट्रम्प म्हणाले, ‘शनिवारी, माझ्या प्रशासनाने हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तात्काळ शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली. मला वाटते की ही कायमस्वरूपी शस्त्रसंधी असेल. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे आहेत. आम्ही आण्विक संघर्ष रोखला. मला वाटतं ते एक भयावह अणुयुद्ध होऊ शकलं असतं. यात लाखो लोक मारले गेली असती.”