
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यामुळे पाकड्यांची चांगलीच तंतरली होती. दोन दिवसातच त्यांनी शस्ंत्रसंधी घडवून आणण्यासाठी अमेरिकेला विनंती केली. तसेच शस्त्रसंधी झाल्यानंतर आपल्यामुळेच शस्त्रसंधी झाली आहे, असा डांगोरा ट्रम्प पिटत आहे. जागतिक राजकारणात ट्रम्प यांचा दबदबा कमी होत आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा फटका त्यांना बसत आहे. तसेच अमेरिकेतही त्यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी आता डर्टी पॉलिटिक्स करण्यास सुरुवात केली आहे.
हिंदुस्थानने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी आर्मी फील्ड मार्शल असीम मुनीर तोमडावर आपटले होते. जागतिक स्तरावर त्यांचे आणि पाकिस्तानचे हसे झाले होते. तोंडावर आपटलेल्या मुनीर यांना अमेरिकेने 14 जून रोजी होणाऱ्या आर्मी डे सेलिब्रेशनला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुनीर 12 जून रोजी वॉशिंग्टन डीसीला पोहोचू शकतात, अशी माहिती मिळाली आहे.
वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानी दूतावासातील सूत्रांनी माहती दिली आहे की, असीम मुनीर यांना अमेरिकेने 250 व्या अमेरिकन आर्मी डे सेलिब्रेशनला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भेटीदरम्यान, पाकिस्तानी भूमीवर वाढणाऱ्या दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांना अफगाणिस्तान आणि हिंदुस्थनात दहशतवादी हल्ले करणाऱ्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यास सांगू शकतात. यातून ट्रम्प राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानने युद्धबंदीसाठी हिंदुस्थानशी दोनदा संपर्क साधला होता. प्रथम 7 मे रोजी पाकिस्तानने फोन करून युद्धबंदीची विनंती केली आणि त्यानंतर 10 मे रोजी दुपारी पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांसोबत चर्चा झाली आणि त्यानंतर युद्धबंदीवर सहमती झाली. त्यामुळे असीम मुनीर आणि पाकड्यांची चांगलीच तंतरली होती. आता अमेरिकेने मुनीर यांना निमंत्रण देत राजकारण केल्याची चर्चा होत आहे.