
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. या विधेयकात हिंदुस्थानवर 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देण्यात आली आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर हे आयातशुल्क लादण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि रशियाच्या तेल व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सॅन्क्शनींग रशिया अॅक्ट ऑफ 2025 असे या विधेयकाचे नाव आहे. या कायद्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील ऊर्जा व्यापारात अडचणी निर्माण होऊ शकतात. जे देश रशियाकडून तेल, नैसर्गिक वायू, युरेनियम आणि इतर ऊर्जा साधनं आयात करतात, त्यांच्यावर 500 टक्क्यांपर्यंत कर लावण्याची तरतूद या विधेयकात आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या आयातीवर 35 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. हे नवीन शुल्क 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे