
तामीळनाडूमधील रामेश्वरम येथील प्रसिद्ध रामनाथस्वामी मंदिराची दानपेटी उघडण्यात आली. या भक्तांनी केलेल्या दानाची मोजदाद करण्यात आल्यानंतर 1.47 कोटी रुपयांची रोख रक्कम, 98 ग्रॅम सोने, 4 किलो 100 ग्रॅम चांदी आणि 162 विदेशी चलन मिळाले. हे मंदिर देशातील सर्वात प्रतिष्ठत तीर्थस्थळांपैकी एक आहे. या मंदिरात दर्शनासाठी देशविदेशातून भाविक येतात. भाविकांकडून मिळालेल्या देणगीचा वापर मंदिराच्या कामकाजासाठी आणि सामाजिक कार्यासाठी केला जातो.