
डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
आरोग्य उत्तम राखण्यासाठी ऋतूनुसार आहार-विहार-निद्रा याबाबत आयुर्वेदात योग्य दिनचर्या सांगितली जाते. शरीराला या दिपामाची सवय लागली की शांतता, आनंद आणि दीर्घायुष्य निश्चितच मिळते.
आपल्या दैनंदिन जीवनासाठी तयार केलेली अशी दिपाम पद्धत जी आपल्याला आपल्या जैविक घडय़ाळाशी जोडून ठेवते. आयुर्वेदाने हजारो वर्षांपासून निसर्गाशी सुसंवाद राखण्याचे महत्त्व सांगितले आहे, मात्र पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना आता हळूहळू हे समजू लागले आहे की शरीरासाठी निसर्गाच्या लयीशी जोडलेले राहणे किती आवश्यक आहे. या लयीत बिघाड झाल्यास मेंदूची कार्यक्षमता कमी होणे, मनस्थिती व झोपेचे विकार, मधुमेह, स्थूलता, दिवसा झोप येणे, शिकण्यात अडचणी, व्यसनाधीनता, हृदयरोग आणि काही प्रकारचे कर्करोग असे अनेक आरोग्यविषयक त्रास होऊ शकतात.
आयुर्वेदानुसार प्रत्येक दिवशी बदलाची दोन चक्रे असतात – सूर्यपा आणि चंद्रपा. ही पो आपल्या दोषांशी (वात, पित्त, कफ) संबंधित असतात. दिनचर्येमुळे आपल्याला लवकर उठणे, व्यायाम, स्नान, ध्यान, प्रार्थना, आहार, अभ्यास, काम, विश्रांती आणि झोप यांसाठी योग्य वेळ समजतो. निरोगी शरीर, मन आणि आत्म्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या दिनचर्येचे फायदे अनेक आहेत. उदाहरणार्थ- दोषांचे संतुलन राखण्यास मदत, पचनािढया सुधारते, शिस्त लागते, शांतता, आनंद आणि दीर्घायुष्य मिळते.
वरील दोषपांवर आधारित आदर्श दिनक्रम खाली दिला आहे.
सकाळी उठण्याची वेळ निरोगी व्यक्तीसाठी सूर्योदयाच्या सुमारे दोन तास आधी, म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठावे. या वेळेत वातदोष प्रभावी असतो. हा दिवसातील सर्वोत्तम काळ मानला जातो. या वेळेतील सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराशी जुळवून घेतल्यास ताजेतवाने वाटते. नोकरदार लोकांना लवकर उठणे हे काही नवीन नाही, पण धावपळ सुरू होण्यापूर्वी पुढील काही दिपाम अवलंबिला तर निश्चितच फायदा होईल.
शरीरशुद्धी – आजकाल याला डिटॉक्स म्हणण्याची प्रथा झाली आहे. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे आतडी व मूत्राशय साफ होतात आणि पचनसंस्था सुरळीत राहते. दीर्घकालीन पचनविकार कमी होण्यास मदत होते. ज्ञानेंद्रियांची स्वच्छता राखणे, उदाहरणार्थ- डोळे, त्वचा, कान, नाक आणि जीभ इत्यादी अवयव स्वच्छ करावे. तोंडाची स्वच्छता करताना गुळण्या करणे, दात घासणे आणि जीभ स्वच्छ करणे आवश्यक आहे. यामुळे चवीच्या ग्रंथी सािढय होतात.
व्यायाम आणि स्नान – सकाळी 6 ते 10 या वेळेत व्यायाम करणे सर्वोत्तम असते. कारण हा काळ कफदोषाचा असून शरीर शारीरिकदृष्टय़ा सर्वाधिक मजबूत असते. व्यायामामुळे आळस दूर होतो, जठराग्नी प्रज्वलित होतो, चरबी कमी होते आणि मनाला शांतता व आनंद मिळतो.
सूर्यनमस्कार हा एक अत्यंत महत्त्वाचा व्यायाम प्रत्येकाला करणे आवश्यक आहे. यामध्ये नऊ आसने आहेत. ज्यामुळे आपल्या लसिका ग्रंथी आणि त्यांच्या वहनात सुसूत्रता येते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती वाढते. सेतूबंध हाही एक उत्तम आसन प्रकार आहे. ज्यामुळे जननेंद्रिय आणि आसपास असलेल्या मांसपेशी सुदृढ राहतात. पश्चिमोत्तानासन, पवनमुक्तासन, अर्धमत्स्येंद्रासन, शलभासन, पर्वतासन, वज्रासन अशी अनेक योगासने आहेत, ज्यामुळे पाठ, पोट, मांडय़ा आणि सर्वच शरीराला लवचिकता आणि ताकद येते.
योगासने व प्राणायाम यामुळे दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. नाडीशुद्धी, भ्रामरी, कपालभाती आणि भस्त्रिका या श्वासांच्या व्यायामामुळे मन शांत, प्रसन्न होते. एकाग्रता वाढवते. नैराश्य, चिंता कमी होतात. सायकल चालवणे, चालणे, पोहणे किंवा दोरीवर उडय़ा मारणे हेही चांगले पर्याय आहेत. व्यायामानंतर कोमट पाण्याने स्नान करावे. हलके, आरामदायी कपडे परिधान करावेत. प्रार्थना व ध्यान – प्रार्थना व उपासना म्हणजे परमेश्वराशी संवाद साधण्याची वेळ. सुमारे 20 मिनिटे ध्यान केल्याने प्राणशक्ती संतुलित होते. दिनचर्येत हे अत्यंत महत्त्वाचे असून यामुळे अंतरिक शांतता व समाधान मिळते आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात होते.
दिनचर्येत आहार-विहार महत्त्वाचे असतात. व्यायाम आणि प्रकृतीचे स्वरूप, त्यानुसार दोष हे आपण पाहिले. यात योग्य वेळेनुसार आहार आणि निद्रादेखील तितकीच महत्त्वाची. याबाबत आपण पुढच्या भागात पाहू या.
आयुर्वेदानुसार दोषांचे दैनंदिन चक्र
पहिले चक्र सूर्योदय सूर्यास्त
सकाळी 6 ते 10 कफ
सकाळी 10 ते दुपारी 2 पित्त
दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वात
दुसरे चक्र सूर्यास्त सूर्योदय
संध्याकाळी 6 ते 10 कफ
रात्री 10 ते पहाटे 2 पित्त
पहाटे 2 ते सकाळी 6 वात
























































