6 डिसेंबरपर्यंत इंदू मिलमधील स्मारक

दादरच्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 172 कोटी रुपये खर्च झाले आहेत. साडेतीनशे फुटांचा पुतळा निश्चित केला आहे. हा प्रकल्प 1 हजार 90 कोटी रुपयांचा आहे. इतर सर्व कामे 6 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, शिल्पकार राम सुतार पुतळ्याचे अतिशय चांगले काम करीत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.