डॉ. जब्बार पटेल यांचा शाहू पुरस्काराने सन्मान

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा शाहू पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराची रक्कम आनंदवन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांना विभागून देत असल्याचे पटेल यांनी जाहीर केले.