23 लाखांत मिळणार दुबईचा गोल्डन व्हिसा

संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारने एक नवीन गोल्डन व्हिसा योजना सुरू केली आहे. या नवीन योजनेंतर्गत आता हिंदुस्थानी व्यक्ती 1 लाख दिरहम म्हणजेच जवळपास 23.30 लाख रुपये देऊन हा गोल्डन व्हिसा मिळवू शकणार आहे. याआधी हिंदुस्थानी नागरिकांना गोल्डन व्हिसासाठी कमीत कमी 20 लाख दिरहम म्हणजेच जवळपास 4.66 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी करावी लागत होती.