मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा विमानांनाही फटका, 50 उड्डाणं प्रभावित

मुंबईत झालेल्या पावसामुळे लोकल सेवेला फटका बसला आहे. आता या पावसामुळे विमान सेवाही प्रभावित झाली आहेत. मुंबईत पाणी साचणे व वाहतुकीतील अडचणी लक्षात घेता अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांना आगाऊ नियोजन करण्याचे आवाहन करत प्रवास सूचना जारी केल्या आहेत.

मुंबईत झालेल्या पावसामुळे सकाळी 8:26 वाजेपर्यंत सुमारे २१ उड्डाणे विलंबित झाली, दोन उड्डाणे रद्द करण्यात आली आणि ४० हून अधिक उड्डाणे वेळापत्रकापेक्षा उशिरा धावली. शुक्रवारपासून मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरूच असल्याने मुंबईत अनेक ठिकाणी साचले आहे, त्यामुळे दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.

मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. लोकलाही पावसाचा फटका बसला असून, मुंबई सह ठाणे, पालघरलमध्येही नागरिकांचे हाल झाले आहेत.

इंडिगो, स्पाइसजेट आदी कंपन्यांची प्रवाशांना सूचना
इंडिगो, स्पाइसजेट, अकासा एअर आणि एअर इंडिया यांसह अनेक विमान कंपन्यांनी मुंबईहून प्रवास करणाऱ्या तसेच मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत.मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम होऊन उड्डाणांमध्ये अडचणी येऊ शकतात, असे इंडिगोने बुधवारी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून सांगितले आहे. तसेच कंपनीने प्रवाशांना , विमानतळावर येण्यापूर्वी आपले उड्डाण वेळापत्रक तपासण्याचे आणि घरातून लवकर निघण्याचे आवाहन केले आहे.

स्पाइसजेटने देखील बुधवारी सकाळी सोशल मिडियावर अशीच सूचना जारी केली, ज्यात मुसळधार पावसाचा हवाला देत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण सेवांवर परिणाम होऊ शकतो, असा सूचना प्रवाशांना देण्यात आली आहे.