बेकायदा बेटिंगप्रकरणी आमदार अटकेत

बेकायदा बेटिंग व मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने आज कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना सिक्कीममधून अटक केली. त्यांच्याकडून 12 कोटी रुपयांची रोकड, 6 कोटींचे सोन्याचे दागिने आणि 10 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. के. सी. वीरेंद्र हे कर्नाटकातील चित्रदुर्ग विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.