
जगप्रसिद्ध टेक कंपनी गुगल आणि मेटाला सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने नोटीस पाठवली आहे. सट्टेबाजी अॅप प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधीने 21 जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहावे, असे नोटिसीत म्हटले आहे. ईडी सध्या ऑनलाईन सट्टेबाजी अॅप प्रकरणी तपास करत आहे.
या अॅपला गुगल आणि मेटा यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमोट केले जाते. यामुळे या दोन्ही कंपन्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, अनेक ऑनलाईन अॅप हे हवाला आणि मनी लॉण्ड्ररिगमध्ये सहभागी आहेत. गुगल आणि मेटा जाहिरातीसाठी या अॅप्सला अनेक स्लॉट्स देतात. यामुळे केवळ बेटिंग अॅपची लोकप्रियता वाढत नाही तर अवैध कार्याला बळ मिळते. प्ले स्टोअर आणि यूटय़ूब सारखे प्लॅटफॉर्म गुगलचा भाग आहेत. तर इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचे पेरेंट कंपनी मेटा आहे.