
चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली रस्त्यात उलटल्याची घटना घडली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एखा बालकाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताबाबत सखोल तपास सुरू आहे.
पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील दसुया-हाजीपूर रस्त्यावरील सागरा बस स्टँडजवळ हा अपघात झाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या समोर अचानक कार आली. बसचा वेग जास्त असल्याने चालकाला नियंत्रण करण्यास जमलं नाही. नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात बसमधील प्रवाशांसह कारमधील प्रवासीदेखील जखमी झाले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.